औरंगाबाद : चितेगाव येथील व्हिडिओकॉन कंपनी च्या रेफ्रिजरेटर प्लांट मध्ये भीषण आग लागण्याची घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.चितेगाव येथील व्हिडिओकाॅन कंपनीच्या व्हॅल्यू इंडस्ट्रीज रेफ्रीजरेटर प्लांन्टच्या - स्टोन-15 मधील खुल्या जागेतील स्क्रॅप व राॅ-मटेरिअल ला रात्री 03:00 च्या सुमारास आग लागली होती.अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. सुरुवातीस वारा असल्यामुळे आग आजुबाजुला पसरल्याने विझविण्यासाठी वेळ लागत होता. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळी सहह्याक पोलीस निरीक्षक बनसोडे,उपनिरीक्षक आईटवार, पोलीस कर्मचारी लोणे, घोळवे, चव्हाण, पैठणकर , चालक भागडे, मस्के यांनी धाव घेतली होती.या घटनेची बिडकीन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.